🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी वेदांता फॉक्सकाॅन मुळे राज्याचे किती नुकसान झाले याची आठवण करून देत अनेक आरोप केले आहेत. हा प्रकल्प राज्या बाहेर गेल्याने किती रोजगार गेले याची देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी आठवण करून दिली. मात्र आदित्य ठाकरे केवळ यावरच थांबले नसून वर्सोवा बांद्रा सी लिंक विषयी सर्वात मोठा आरोप त्यांनी एकनाथ शिंदे सरकार अर्थात राज्य सरकारवर केला आहे.
वेदांता फॉक्सकॉनवरुन राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही, बल्कड्रग पार्कही राज्याचा बाहेर गेला, त्यावरही उत्तर नाही, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्री दिल्लीत स्वत:साठी गेले की महाराष्ट्रासाठी, शिंदेची दिल्लीवारी आठवी आहे आणि २ वाऱ्या लपून छपूनसह १२ वी वारी, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यातील किती प्रकल्पांना खोके सरकारने स्थिगिती दिली? हे पाहणे हा देखील एक सवाल आहे. वर्सोवा ब्रांदा सी लिंक हे देखील काम बंद पाडले असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
दरम्यान, वर्सोवा ब्रांदा सी लिंक हे काम मुंबईत आणि मुलाखती चेन्नईत होत आहेत, वेदांताच्या अध्यक्षांना महाराष्ट्राला काहीतरी देऊ हे ट्ववीट करण्यासाठी दवाब आणला, वेदांता फॉक्सकॉनवरुन राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर आलेलं नसल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Raju Srivastav Death | “हरहुन्नरी कलावंत गमावला” ; एकनाथ शिंदे यांची राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली
- Viral Video | कुत्र्याच्या आनंदासाठी एका व्यक्तीने केले अनोखे काम, बघा व्हिडिओ!
- Sharad Pawar | “पत्राचाळ प्रकरणी लवकरात लवकर चौकशी करा”, शरद पवारांची मागणी
- Health Tips | फक्त 5 मिनिटे! नखांवर घालवलेला थोडा वेळ तुमच्या आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या!
- Shivsena | “राज्यात दसरा मेळाव्यावरुन महाभारत होणार”, शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
