🕒 1 min read
गणेशविसर्जनानंतर राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र आज या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मते, राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईसह ठाणे शहरात जोरदार पाऊस झाला. यासोबतच पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे. काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. दरम्यान आज (20 सप्टेंबर) विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सोलापूरमध्येही पावसाचा यलो अलर्ट आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत देखील झाले होते. याचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | “शहराला अजूनही पालकमंत्री नाही, म्हणूनच मी खासदार या नात्याने…’, सुप्रिया सुळेंनी प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
- Narayan Rane | नारायण राणेंना झटका! अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे हायकोर्टाचे आदेश
- Maharashtra Board Exam Time Table | महाराष्ट्र बोर्डाकडून १०वी, १२वीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार परिक्षा!
- Narayan Rane | नारायण राणेंना दणका! मुंबई हायकोर्टाने अधिश बंगल्याचा मागणी अर्ज फेटाळला
- Gulabrao Patil | “आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल! अन् उद्धव ठाकरेंच्या…”, गुलाबराव पाटलांचा टोला
- Health Tips | तुम्ही उभे राहून पाणी पितात का? तर ही सवय आजच सोडा, कारण आरोग्यासाठी ते आहे अत्यंत हानिकारक..जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
