Share

“…तर ते आमच्यावरही हल्ला करू शकतात”; रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Published On: 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती. आता ११ दिवसानंतर राणा दाम्पत्याला जामीन मिळाला मात्र त्यांनतर लगेचच नवनीत राणा यांची तब्बेत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

राणा दाम्पत्य यांच्या मुंबईतील घरात अवैध आणि चुकीचं बांधकाम केलं असल्याचा आरोप करत त्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रवी राणा म्हणाले, “आम्ही तुरुंगात असताना आमच्या घरावर दो-तीनवेळा नोटीसी लावल्या. सुडाचं राजकारण करत आम्हाला त्रास देण्यासाठी ही एकतर्फी कारवाई आमच्यावर होत आहे. मी गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेची वाट पाहात आहे, की या फ्लॅट बघून घ्या, मोजून घ्या कारण ती इमारत मी बांधलेली नाही. अनेकांनी त्याठिकाणी फ्लॅट घेतले. तसं आम्हीही इथे फ्लॅट घेतला आणि महापालिकेनेच त्याची परवानगी दिलीये. शिवसेनेच्या महापौरांनी मान्यता दिलीये. मान्यता देणारेच जर दबावाखाली येऊन कारवाई करत असतील तर हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे”.

“ही इमारत गेल्या १५ वर्षांपूर्वी बांधलेली आहे आणि बिल्डरकडून आम्ही फ्लॅट घेतलाय. मी कुठलाही इमारत बांधली नाही. मी बिल्डर नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. एखादा फ्लॅट जर आम्ही मुंबईत घेतलाय आणि मुख्यमंत्र्यांना द्वेषाच्या राजकारणातून तो तोडायचा असेल, तर मला असं वाटतं की ते मुख्यमंत्री आहेत, त्याच्याकडे पावर आहे, ते कुठल्याही प्रकारची कारवाई आमच्यावर करू शकतात. जर ते आम्हाला खोट्या केसवरून तुरुंगात टाकू शकतात तर ते आमचा फ्लॅट काय आम्हालाही मारू शकतात आमच्यावरही हल्ला करू शकतात. त्यांच्याकडील अधिकाराचा ते दुरूपयोग करणार आहेत. मात्र, आम्ही त्यांना सहकार्य करू”, असेही रवी राणा यांनी म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!