🕒 1 min read
मुंबई: हनुमान चालीसावरून राज्यात सध्या वातावरण चांगलेच तापले असताना पाहायला मिळत आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका महिलेला घाबरले, म्हणून त्यांनी आमच्यावर ही कारवाई केली”, असा आरोप आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयावरही संजय राऊतांनी आक्षेप घेतला. यांच्यावरही राणा यांनी सडकून टीका केली.
“संजय राऊत हे चवन्नी छाप आहेत. संजय राऊतांना हा अधिकार कोणी दिलाय, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. तसेचं पुढे बोलताना, पोलिसांनी आम्हाला जामीन देणार म्हणून पोलीस ठाण्यात नेलं. तिथे त्यांनी आम्हाला चहा दिला. त्यानंतर रात्री १२ नंतर सांताक्रुझ जेलमध्ये आम्हाला टाकलं. त्याठिकाणी पाणी दिलं नाही, बाधरूम वापरू दिलं नाही, पंखा सुद्धा नाही, चटई सुद्धा दिली नाही. आम्ही ५ वाजेपर्यंत चटई आणि पंखा, पाण्यासाठी मागणी करत होतो. एका महिलेचा इतका छळ करणे म्हणजे उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारची सक्तीची कारवाई आमच्यावर केली”.
“हनुमानाचं नाव घेतल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्राचं हे दुर्दैवं आहे. १४ दिवस आम्हाला जेलमध्ये ठेवणाऱ्या या मुख्यमंत्र्यांचा अहंकार मोडला जाईल. जे रावणाचं झालं तेच मुख्यमंत्र्यांचं होणार आहे. हनुमान आणि रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”, असा इशाराही रवी राणा यांनी दिला.
“दोन लहान मुलं आणि वृद्ध आई-वडील घरात होते. शिवसेना कार्यकर्ते घरावर दगडफेक करत होते. त्यांच्यावर कुठलाही कारवाई झाली नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईलवर कारवाई करायला हवी. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचाऱ्यांवर कारावई करावी. दिल्लीला जाऊन आम्ही ही मागणी करणार”, असंही रवी राणा म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
