Share

“…तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे?”, देवेंद्र फडणवीस यांची मविआ सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब भाजयुमो अध्यक्ष प्रशांत लोमटे आणि इतरांनी जिल्ह्यातील 3,50,287 शेतकर्‍यांवर पीकविम्यासंदर्भात झालेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या सर्व शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यापलिकडे आणि जबाबदारी ढकलण्यापलिकडे महाविकास आघाडी सरकार काहीच करीत नाही. राज्यात सरकार असताना शेतकर्‍यांना आपले लढे उच्च न्यायालयापर्यंत लढावे लागत असतील, तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे?’, असे फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, विमा कंपन्यांनी 6 आठवड्यात या शेतकर्‍यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. विमा कंपन्यांनी ही भरपाई न दिल्यास 6 आठवड्याच्या आत राज्य सरकारने ही नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकर्‍यांना मदत करावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!