🕒 1 min read
मुंबई : मागील काहीदिवसांपासून राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना १४ मे ला जाहीर सभा घेवून विरोधकांचा समाचार घेणार आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमात याविषयी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की,’गेले काही दिवस आपण माणसातच आहोत. आज मास्क काढला, पण तसा मास्क काढायचा आहे तो १४ तारखेला काढीन.’ दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘१४ तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा असून त्यांना त्यांच्या मनातलं बोलायचंय. ‘टोमणे कट्टा’ एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्या टीमने तयार राहावं कारण दोन वर्षे टिकेल एवढं मुख्यमंत्री त्यांना मटेरियल देतील. १४ तारखेला शनिवार येतो, कुटुंबाला घेऊन फिरायला जा, काही करा पण ‘UT series’ नको’, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1523165797337550849?s=20&t=bGoCxfNeIbwm55WD9saYZA
दरम्यान, ‘१४ तारखेला माझ्या मनात आहे ते मी बोलणार.’ तसेच निवडणुका आल्या की थापांचा पूर येतो. राजकारण जरूर करा पण त्यात एक दर्जा असला पाहिजे. नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी नाही, असेही मुख्यमंत्री मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमात बोलत असतांना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे?”, देवेंद्र फडणवीस यांची मविआ सरकारवर टीका
- “हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरेंनी…”, संजय राऊत यांचे टीकास्त्र
- “ज्यांना काहीच निर्माण करता येत नाही तेच इतिहास…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
- नवनीत राणांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले,“या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा…”
- “काढलेले भोंगे पुन्हा लावल्यास त्यांच्यावर…”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
