मुंबई : श्रीलंकेने लसिथ मलिंगाची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी गोलंदाजी रणनीती प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मलिंगा राष्ट्रीय संघासोबत काम करेल, असे श्रीलंका क्रिकेटने एका निवेदनात म्हटले आहे. तो मैदानावर धोरणात्मक योजना राबविण्यास संघाला मदत करेल. याशिवाय तो गोलंदाजांच्या तांत्रिक कौशल्यावरही काम करणार आहे.
लसिथ मलिंगाचा अफाट अनुभव आणि टी-२० क्रिकेटमधील प्रसिद्ध डेथ बॉलिंग कौशल्य श्रीलंकेला आगामी मालिकेत मदत करेल असा विश्वास श्रीलंका क्रिकेटने व्यक्त केला आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लसिथ मलिंगाने अशी भूमिका बजावली होती. याशिवाय नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये लसिथ मलिंगाने राजस्थान रॉयल्ससोबतही काम केले आहे. राजस्थान रॉयल्स संघ अंतिम सामन्यातही पोहोचला होता. श्रीलंकेत सध्या राजकीय व आर्थिक गोंधळ सुरू आहे. याशिवाय देशात आर्थिक लोकांना संकटांनाही तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाच्या या दौऱ्यावर संकटाचे ढग दाटून आले होते. मात्र, आता ऑस्ट्रेलियाने वेळेवर दौरा करण्याचा निर्णय घेतला आणि कांगारू संघ श्रीलंकेतदेखील पोहोचला आहे. यामुळे आता श्रीलंका बोर्ड आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनासाठीही मदत करेल. या दोन्ही संघांमध्ये ७ जूनपासून कोलंबोमध्ये टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.
Lasith Malinga appointed as the fast bowling consultant for Sri Lanka in the Australia ODI & T20 series. (Source – Sports Pavilion)
— Johns. (@CricCrazyJohns) June 2, 2022
श्रीलंकेचा संघ नुकताच बांगलादेशमध्ये कसोटी मालिका खेळून आला आहे. श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशवर या मालिकेत १-० असा विजय मिळवला. श्रीलंकेचा संघ घरच्या मालिकेत कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ऑस्ट्रेलियाने तिन्ही फॉरमॅटसाठी आपला मजबूत संघ तिथे पाठवला आहे. मालिका तिन्ही फॉरमॅटमध्ये असल्याने ऑस्ट्रेलियन संघासाठी हा दौरा मोठा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:


