Share

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा खेळाडू बॅटिंग-बॉलिंग न करता पडला संघाबाहेर; वाचा!

Published On: 

मुंबई : इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला धमाकेदार सुरुवात केली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, न्यूझीलंडचा संघ पूर्वार्धातच गडबडला. दरम्यान इंग्लंडसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याच्या जागी मॅथ्यू पार्किन्सनचा समावेश केला आहे. पार्किन्सन लँकेशायरसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याचा थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला गेला आहे.

इसीबीने एक निवेदन जारी केले की, “क्षेत्ररक्षण करताना डोक्याला दुखापत झाल्यानंतर जॅक लीचला गंभीर दुखापत झाल्याची लक्षणे दिसत आहेत. दुखपतीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्याला या सामन्यात खेळता येणार नाही. न्यूझीलंडच्या डावाच्या सहाव्या षटकात चौकार वाचवताना लीचच्या डोक्याला दुखापत झाली. हे षटक स्टुअर्ट ब्रॉडने टाकले होते. डेव्हन कॉनवेने ब्रॉडच्या एका चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटवरून जोरदार शॉट खेळला आणि जॅक लीचने चेंडू सीमारेषा अडवण्याचा प्रयत्न केला होता. पण, असे करताना तो त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर तो काही काळ जमिनीवर पडून होता. नंतर त्याला संघाच्या वैद्यकीय पथकाने मैदानाबाहेर नेण्यात आले.”

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती. जेम्स अँडरसनने टॉम लॅथम आणि विल यंग या दोन्ही सलामीवीरांना २ धावांच्या आत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हे दोघेही स्लिपमध्ये जॉनी बेअरस्टोच्या हाती झेलबाद झाले. हे दोन्ही फलंदाज प्रत्येकी एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतले. आधी विल यंग आणि नंतर टॉम लॅथम बाद झाला होता. २ धावांत २ गडी गमावलेल्या न्यूझीलंडचा डाव सांभाळण्याची जबाबदारी आता कर्णधार केन विल्यमसनच्या खांद्यावर आली होती. मात्र, आयपीएलप्रमाणे येथेही विल्यमसन फ्लॉप ठरला आणि २ धावा करून पदार्पण करणारा मॅथ्यू पोटसचा पहिला बळी ठरला. यानंतर पोटसने डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेलची शिकार केली. अशाप्रकारे या गोलंदाजाने त्याच्या पहिल्या ६ षटकात ३ बळी घेतले. स्टुअर्ट ब्रॉडलाही एक गडी बाद करण्यात यश आले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!