Share

Sachin Ahir : उध्दव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडली – सचिन अहिर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी मोठा बंड पुकारल्यानंतर पक्षाला गळती सुरू झाली. पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटाकडे वळले. त्यामुळे आता शिवसेना पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच पर्व सुरू केलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत देखील कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. यादरम्यान एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात एकमेकांवर कडाडून टीका केल्या जात आहेत. शिंदे गटातील अनेक आमदारांनी शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वावर तसेच संजय राऊत यांच्यावर अनेक वेळा टीका केली आहे. आता शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी देखील शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला सचिन अहिर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरही भाष्य केले. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याविषयी बोलताना अहिर यांनी सरकारवर चांगलाच पलटवार केला आहे. कोण कोणाला चिठ्ठ्या देताय, माईक ओढून घेतंय हे सर्व जनता बघत आहे. याला उत्तर जनता देईल. आगामी काळात तुम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरे जाल तेव्हा जनता तुम्हाला स्वीकारणार नाही. त्यावेळी शिवसेनेचे दरवाजेही तुमच्यासाठी बंद झालेले असतील. असे सचिन अहिर म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी चंद्रकांत पाटील आता किती दिवस मनावर दगड ठेवून राहतात तेही पाहू, असाही टोला अहिर यांनी लगावला.

उध्दव ठाकरे राज्याचं नेतृत्व उत्तमप्रकारे करत होते. त्यामुळे ते पुढील काही दिवसांत देशातही नेतृत्व करतील या भीतीने भाजपने शिवसेना फोडली. असा आरोपही सचिन अहिर यांनी भाजपवर केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व करत होते. ते असेच यशस्वी राहिले असते तर देशाचं नेतृत्व करतील या भीतीने भाजपने फोडफोडीच षडयंत्र केलंय”, असे अहिर बोलताना म्हणाले. दरम्यान शिंदे गटात सामील झालेले खासदार बारणे यांनाही सचिन अहिर यांनी चांगलंच सुनावलं. बारणे यांनी शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको होती. मात्र त्यांनी स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केला. असेही सचिन अहिर म्हणाले.

शिवसेनेत आत्तापर्यंत सर्वात मोठा बंड झाल्यामुळे पक्षाला मोठी गळती लागली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचासह आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सचिन अहिर असे मोठे नेते शिवसेनेला भक्कम करण्यासाठी मेळावे घेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. शिवसेनेच्या मेळाव्यांना व सभांना जनतेचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. शिवसेनेची ही तयारी पाहता आगामी काळात भाजपला मोठ्या आव्हान देण्याची तयारी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!