Share

Devendra Fadnavis | “राऊतांविषयी कशाला विचारता, सेन्सिबल माणसाबद्दल विचारा”; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणि टीकास्त्रांचा सामना थांबायचं नाव घेत नाहीये. कालच्या भाषणात फडणवीस यांनी केलेल्या टीकांना आज सकाळीच संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते. यातच आता पुन्हा फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. त्याचवेळी संजय राऊतांबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले कि, “राऊतांना आता तरी समज आली पाहिजे कि त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीये. त्यामुळे तुम्ही मला त्यांच्याबद्दल कशाला विचारता? एखाद्या सेन्सिबल माणसाबद्दल विचारा”, असा खोचक टोला त्यांनी यावेळी राऊतांना लगावला. त्याचबरोबर विरोधकांकडून होणाऱ्या टीकांवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले कि, “विरोधकांचं कामच असतं टीका करणं. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच आज ही परिस्थिती आली आहे. मात्र आम्ही ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच करू:”

दरम्यान, राज्यात सरकार स्थापन होऊन २४ दिवस होऊन गेले तरीही अजून मंत्री मंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधीपक्ष शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मंत्री मंडळ विस्तारा संदर्भात चर्चा केली होती. तशीच चर्चा करण्यासाठी आजही फडणवीस दिल्लीला गेले असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे लवकरच मंत्री मंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे.

महतवाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!