Sachin Ahir । मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. मात्र सगळ्यांना वाटत होत कि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार मात्र ऐन वेळेला ही घोषणा करण्यात आली कि, मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हे विराजमान होतील. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. याच घटनेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पनवेलच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मोठं भाष्य केलं होत. तर पाटलांच्या टीकेला आता शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
कोण कोणाला चिठ्ठ्या देताय, माईक ओढून घेतंय हे सर्व जनता बघत आहे. याला उत्तर जनता देईल. त्यांना हे आवडलं नाही. आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल तेव्हा हेच आमदार, खासदार परततील. पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असं सांगतानाच चंद्रकांत पाटील आणखी किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत तेही पाहू. बघुयात, असं टोला सचिन अहिर यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. तसेच उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व यशस्वीपणे करत होते. त्यामुळे एक दिवस उद्धव ठाकरे देशाचंही नेतृत्व करतील या भीतीनेच भाजपने शिवसेनेत फूट पाडली, असा दावाही अहिर यांनी केला.
दरम्यान, स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे संभाळलं. मात्र मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केला. आपल्याला या गोष्टीच दुःख झालं. परंतु हे दुःख पचवून सगळे जण हा गाडा चालवण्यासाठी पुढे आलो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच केंद्राने जो निर्णय दिला तो देवेंद्र फडणवीस यांनी लगेच मान्य केला, त्यासाठी फडणवीसांना सलाम करूया, असे म्हणत त्यांनी उपस्थितांना उभे राहायला सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray : उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, ते बोलतात एक आणि करतात दुसरेच; राज ठाकरेंचा टोला
- Girish Mahajan | भारतीय जनता पक्षाला संपवण्याचं कटकारस्थान रचलं गेलेलं – गिरिश महाजन
- Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘या’ बड्या नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
- viral video | पुन्हा घडला तोच प्रकार; तिरुमाला देवस्थानने काढायला लावली शिवाजी महाराजांची मूर्ती
- Praniti Shinde | बटणावरील मतदानाने सगळे बिघडले, आता शिक्काच हवा – प्रणिती शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

