Share

Deepali Sayed : “मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती आणि अमित म्हणजे…”; दीपाली सय्यद यांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

Deepali Sayed ।  मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर ते काही दिवस आराम करत होते. मात्र काल पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून शिवसेना आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे हे बोलतात एक आणि करतात दुसरेच. यावरून ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यानंतर मात्र राज ठाकरे यांच्या या टीकेला आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत सडेतोड प्रत्युत्तर दिल आहे.

दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे, वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये, असा टोला लगावला.

तर पुढे दुसऱ्या ट्विटमध्ये सय्यद म्हणाल्या कि, मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती आणि अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडुन घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेट ने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री?, असं म्हणत त्यांनी मनसेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक आमदार मिळूनही मुख्यमंत्री पदावर शिवसेनेने दावा केला होता. विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे ठरल्याचे उद्धव सांगत आहेत. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे निवडणुकीच्या प्रचारसभेत जाहीरपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असे सांगत होते. त्यावेळी उद्धव गप्प का बसले, असा सवालही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!