🕒 1 min read
Raj Thackeray । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. या संख्याबळाच्या जोरावर शिंदेंनी भाजपशी हात मिळवून राज्यात सत्ता स्थापन केली. तर दुसरीकडे शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला गळती लागली. त्यामुळे आमदारांसह शिवसेना पक्षाचे खासदार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही शिंदे गटाच्या वाटेवर निघाले. राज्यात एकनाथ शिंदेंनी संख्याबळ दाखवत जरी सत्ता स्थापन केली असली, तरी ती कायद्याच्या चौकटीत टिकेल का हा मात्र अजूनही प्रश्नच आहे. सरकार शाबूत ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा करण्यात येत आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल दिलेल्या एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बोलतात एक आणि करतात दुसरेच. यावरून ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक आमदार मिळूनही मुख्यमंत्री पदावर शिवसेनेने दावा केला होता. विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे ठरल्याचे उद्धव सांगत आहेत. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे निवडणुकीच्या प्रचारसभेत जाहीरपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असे सांगत होते. त्यावेळी उद्धव गप्प का बसले, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला.
दरम्यान, सरकार शाबूत ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा करण्यात येत आहे. असे असताना शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘या’ बड्या नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
- viral video | पुन्हा घडला तोच प्रकार; तिरुमाला देवस्थानने काढायला लावली शिवाजी महाराजांची मूर्ती
- Praniti Shinde | बटणावरील मतदानाने सगळे बिघडले, आता शिक्काच हवा – प्रणिती शिंदे
- Shivsena : शिर्डीत मुस्लीम मावळ्यानं उद्धव ठाकरेंसाठी चक्क रक्तानं लिहिलं पत्र; व्हिडीओ व्हायरल
- Sanjay Raut | मिस्टर फडणवीस, आय एम रेडी टू फेस एनी ॲक्शन- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
