मुंबई: बॉलिवूड मधील गोल्डन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे वयाच्या ६९ वर्षी निधन झाले आहे. बप्पी लाहिरी यांची काळ रात्री तब्येत बिघडल्यानंतर त्यांना जुहू येथील रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्यांचे निधन झाले आहे.
बप्पी लाहिरी हे १९७० -८० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात ‘चलते चलते’, ‘डिस्को डान्सर’ आणि ‘शराबी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी देण्यासाठी ओळखले जातात. त्याचे शेवटचे बॉलीवूड गाणे ‘बंकुस’ हे २०२० मध्ये आलेल्या ‘बागी 3’ चित्रपटासाठी होते. बप्पी लाहिरी एक महिन्यापासून रुग्णालयात होते आणि सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरी भेटण्यासाठी बोलावले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्या होत्या. ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया) मुळे त्यांचे निधन झाले आहे.
बप्पी लाहिरी, यांना भारतात “डिस्को किंग” म्हणून ओळखले जाते, त्यांचा जन्म १९५२ मध्ये कोलकाता पश्चिम बंगाल येथे शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचे वडील, अपरेश लाहिरी हे एक प्रसिद्ध बंगाली गायक होते आणि त्यांची आई बन्सरी लाहिरी संगीतकार आणि गायिका होत्या. लता मंगेशकर यांना गमवून अवघा एक आठवडा झाल्यानंतर बप्पी लहरींच्याही जाण्याने संपूर्ण भारत हळहळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर श्रीशांतची भावनिक पोस्ट म्हणाला..
- ‘कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत’ – किरीट सोमय्या
- “आज फिर एक बिल्लीने…” ; अमृता फडणवीसांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका
- ‘राऊत साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ‘ब्लू आईड बॉय’ आहात की शरद पवारांचे’ – मोहित कंबोज
- “याला म्हणतात, लोंबत्या…”; नितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

