🕒 1 min read
मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेचे खासदार, आमदार व पादाधीकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजप, ईडी आणि किरीट सोमय्या यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे.
दरम्यान अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत संजय राऊतांवर निशाणा साधला. “आज फिर एक बिल्लीने दहाड़ने की कोशिश की है!”, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.
आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !#Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 15, 2022
काय म्हणाले संजय राऊत?
यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली. “ठाकरे परिवाराच्या नावावर १९ बंगले आहेत, असा दावा त्या दलालाने (किरीट सोमय्या) केला आहे. त्याला माझं आव्हान आहे. आपण सगळे मिळून बस करून त्या १९ बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी चाव्या देतो. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन”,असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.
“पीएमसी बॅंकेचे तपास ईडी करत आहे. मी किरीट सोमय्याच्या भ्रष्टाचाराचे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. गेल्या तीन महिन्यात किमान तिनवेळा ईडी कार्यालयात पाठवले आहेत. तुम्ही एक गुंठे, दोन गुंठे वाल्यांना बोलावता. मी बघितले आहे, हा किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयामध्ये बसून रोज दही आणि खिचडी खातो, त्याच्या बापाचं राज्य आहे का. ईडीचे सर्व लोक वसूली एजेंट बनले आहेत,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “याला म्हणतात, लोंबत्या…”; नितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक टीका
- ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का? – नाना पटोले
- “ED च्या कार्यालयात बसून किरीट सोमय्या दही खिचडी खातो”; संजय राऊतांचा आरोप
- “ईडीच्या नावाखाली मुंबईतल्या प्रतिष्ठित ७० बिल्डर्सकडून कोट्यावधींची वसुली सुरु”, संजय राऊतांचा खुलासा
- राऊतांचा पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेला- प्रविण दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
