मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आज (मंगळवार) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार, आमदार व पादाधिकारी उपस्थित होते. संजय राऊत यांनी तिखट शब्दात भाजप, ईडी आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, विरोधकांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका करत पलटवार केला आहे. “चाटायचं असेल तेव्हा पवार साहेब, चावायचं असेल तेव्हा बाळासाहेब, याला म्हणतात… लोंबत्या राऊत!”, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून राऊतांचा पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेला, असे ते म्हणाले आहे.
चाटायचं असेल तेव्हा .. पवार साहेब!!
चावायचं असेल तेव्हा.. बाळासाहेब !!
याला म्हणतात.. लोंबत्या राऊत!!
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 15, 2022
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रविण दरेकर म्हणाले की, “यांना यांना केवळ ढोल पिटायचेत. पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेल्याचे चिन्ह दिसले. शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी, तसेच इतर नेत्यांनी याकडे पाठ फिरवली.”
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, “मुंबई शिवसेनेचा बेस असून देखील नाशिकवाले इकडे आले आणि त्यांनी हा इव्हेंट केला. परंतु ते तोंडावर पडले. कारण शिवसैनिकांना असे आक्रस्थाळपणाने वागणं आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या समोर भरकटत जाणं. अजिबात आवडलेलं नाही”, असेही दरेकर यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का? – नाना पटोले
- “ED च्या कार्यालयात बसून किरीट सोमय्या दही खिचडी खातो”; संजय राऊतांचा आरोप
- “ईडीच्या नावाखाली मुंबईतल्या प्रतिष्ठित ७० बिल्डर्सकडून कोट्यावधींची वसुली सुरु”, संजय राऊतांचा खुलासा
- राऊतांचा पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेला- प्रविण दरेकर
- “मोहित कंबोज भाजपचा फ्रंटमॅन, फडणवीसांना बुडवणार”, संजय राऊतांचा मोठा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

