🕒 1 min read
मुंबई: IPL मेगा ऑक्शनमध्ये ५९० खेळाडूंवर बोली लावण्यात आली. ज्यात एकूण २०४ खेळाडू सोल्ड झाले आहेत. यात अनेक नावे करोडोंच्या घरात संघानी विकत घेतली तर काही मोठी नवे सुद्धा अनसोल्ड राहिली आहेत. मेगा ऑक्शनच्या आधी एस. श्रीशांतने सुद्धा मेगा ऑक्शनसाठी आपले नाव नोंदवले होते. मात्र तो यावर्षीही अनसोल्ड ठरला. ऑक्शन संपल्यानंतर त्याने एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मेगा ऑक्शनसाठी श्रीशांतने त्याची बेस्ट प्राईस ५० लाख होती. आयपीएलमध्ये आधीच विवादित राहिल्याने श्रीशांतला घेईल का यावर प्रश्नचिन्ह होता. ऑक्शनमध्ये त्याचे नाव येताच १० मधून एकही संघाने त्यासाठी बोली लावली नाही. ऑक्शन संपल्यानंतर श्रीशांतने याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात तो ‘रुक जाना नहीं कहीं तु हारके’ किशोर कुमारांच गाणं म्हणताना दिसत आहे. त्यांनी याखाली सगळ्यांचे पाठींब्यासाठी आभार देखील मानले आहे.
Always grateful and always looking forward…❤️❤️❤️❤️????????????????????????????????????????????????????????????????????????????????????lots of love and respect to each and everyone of u.:”om Nama Shivaya “ pic.twitter.com/cfqUyKxtVK
— Sreesanth (@sreesanth36) February 14, 2022
एस श्रीशांत सध्या केरळ कडून घरेलू क्रिकेट खेळत आहे. २०२० त्याच्यावरील बॅन हटवण्यात आला होता. मॅच फिक्सिंग वादानंतर श्रीशांत पुन्हा टीम इंडियात येण्यासाठी मेहनत करताना दिसत आहे. श्रीशांतने भारतासाठी २७ कसोटी,५३ एकदिवसीय सामने, १० टी-२० सामने खेळले आहेत.ज्यात त्याने ८७, ७५ आणि ७ विकेट्स घेतल्या. श्रीशांत भारताच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक राहिलेला आहे. मात्र त्याच्या भूतकाळातील वादांमुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन अजूनही कठीण दिसते.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत’ – किरीट सोमय्या
- “आज फिर एक बिल्लीने…” ; अमृता फडणवीसांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका
- ‘राऊत साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ‘ब्लू आईड बॉय’ आहात की शरद पवारांचे’ – मोहित कंबोज
- “याला म्हणतात, लोंबत्या…”; नितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक टीका
- ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का? – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
