मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपमधील किरीट सोमय्या, मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) बुडवणार, असं म्हणत संजय राऊत यांनी कंबोजवर मोठा आरोप केलाय.
देवेंद्र फडणवीस यांचा अजून एक फ्रंटमॅन आहे,(Mohit Kamboj BJP frontman) ज्याचे नाव मोहित कंबोज आहे. फडणवीस साहेबांना तो डूबवणार आहे. पत्राचाळ प्रश्न निर्माण करणाऱ्या मोहित कंबोजनेच पत्राचाळची जमीन खरेदी केली आहे. सर्वांत मोठा घोटाळा हा झाला आहे. आणि यामध्येही पीएमसी बँकेचा पैसा यामध्ये लागला आहे. मोहित कंबोज यांचे पत्राचाळ येथे लक्झर कंस्ट्रक्शन सुरु आहे. असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) February 15, 2022
संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपानंतर मोहित कंबोज यांनी यावर पलटवार करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. मोहित कंबोज म्हणाले, राऊतांनी सुरुवात केली की मोहित कंबोजला मी ओळखत नाही. 4 सप्टेंबर 2017 ला राऊत माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी येतात. मी सांगू इच्छित नाही पण जीवनात अनेक वेळा त्यांनी माझ्याकडे पैशाबाबत मदत मागितली आणि मी त्यांची मदतही केली, असा दावा कंबोज यांनी केलाय. तसंच ‘माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मला त्यांनी फडणवीसांसारख्या मोठ्या माणसाचा एक छोटा बॉय म्हटलं. माझा राऊतांना सवाल आहे की ते उद्धव ठाकरे यांचे ब्ल्यॅू आईड बॉय आहेत की शरद पवार यांचे? संजय राऊत यांनी आपली लॉयल्टी कुणाशी आहे ते आधी स्पष्ट करावं, असा खोचक सवाल कंबोज यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“याला म्हणतात, लोंबत्या…”; नितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक टीका
ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का? – नाना पटोले
“ED च्या कार्यालयात बसून किरीट सोमय्या दही खिचडी खातो”; संजय राऊतांचा आरोप


