Share

‘कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत’ – किरीट सोमय्या

Published On: 

मुंबई: आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी राऊत यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर निशाणा साधला आहे. तसेच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर देखील तीव्र शब्दात टीका केली आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्या यांचा हात असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही ट्विटद्वारे पुन्हा निशाणा साधला आहे. २०१७ मध्ये संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशाच प्रकारे माझी पत्नी प्राध्यापिका डॉ. मेधा सोमय्या यांच्यावर इमारत बांधकाम कंपनीच्या संदर्भात आरोप करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला होता, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सोमय्या पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत? प्रविण राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधांवर का बोलत नाहीत? भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहणार आहे, असं किरीट सोमय्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आत्तापर्यंत ठाकरे सरकारमधील नेत्यांनी माझ्याविरोधात १० गुन्हे दाखल केले आहेत. अजून तीन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!