Share

“अपरिपक्व विरोधीपक्षामुळे लोकशाही धोक्यात” ; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

Published On: 

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर उद्या भाजपचे नेते दिल्लीला जाणार आहेत. भाजप नेते दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवाकडे तक्रार करणार आहेत. यावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली आहे. “फडणवीसांनी आधी मुख्यमुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे, कायदा सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न असतील तर शिष्टमंडळासह मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटले पाहिजे ही परंपरा आहे. नंतर राष्ट्रपती, यूनायटेड नेशनकडे जाऊ शकता. पण काही झालं तरी दिल्लीला जाता हा काय तमाशा आहे? महाराष्ट्रात निवडून आलेलं सरकार आहे. हे कोणत्या लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत? लोकशाही आणि राज्यातील शांतता धोक्यात आणण्यात अपरिपक्व विरोधी पक्ष जबाबदार आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. महाराष्ट्र पोलीस सूड भावनेने काम करत नाहीत. मी चुकलो तरी माझ्यावरही कारवाई करतील. सोमय्या विरोधात लोकांमध्ये चीड आहे. आयएनएस विक्रांतचा घोटाळा डिस्टर्ब करणारा आहे. लोकांकडून पैसा गोळा केला गेला. देशाची आणि जनतेची दिशाभूल केली गेली. अशा व्यक्तीच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली असेल, दोन दगडं मारली असतील तर भाजपला दुःख वाटण्याचं कारण काय? भाजपनेही अशा गोष्टींचं समर्थन केले आहे. जे देशद्रोही आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना माफ केलं जाणार नाही असं भाजपच सांगायची, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

घोटाळा करणाऱ्या आरोपीच्या युवक प्रतिष्ठानचे सर्व खाते तपासले पाहिजे. त्यांचे देणगीदार कोण आहेत. कोणी त्यांना आतापर्यंत पैसे दिल आहे. देणगीदाराचे कॅरेक्टर काय आहे. त्यातील अनेक देणगीदार असे आहेत की, त्यांचे ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्याकडून प्रतिष्ठानला पैसाआला आहे. ईडीच्या नावाने धमकावून पैसे घेतले आहेत. सोमय्या म्हणेल कागद कुठे आहे? तर कागद त्यांच्याकडेच आहे. सोमय्या कागद मागेल तर त्याच्या तोंडात कागद देऊ, असे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!