🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण देशाचे लक्ष राषट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकांकडे लागले आहे. भाजपने राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मु यांच्या नावाची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आता भाजप उपराष्ट्रपती पदावर माजी शिवसैनिक सुरेश प्रभू यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. कारण या महत्वाच्या निवडणुकांच्या तोंडावर सुरेश प्रभू आणि अमित शहा यांची दिल्लीत बैठक पार पडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी नंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी भाजप कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या उपराष्ट्रपती पदासाठी दावेदार म्हणून मानले जाणारे सुरेश प्रभू हे माजी शिवसैनिक आहेत. त्यांनी तळकोकणातील राजापूर मतदार संघातून १९९६ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. १९९८ आणि १९९९ मध्ये त्यांना लोकसभेत यश मिळाले होते. त्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन नेते निलेश राणे यांनी २००९ मध्ये सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना २०१४ मध्ये राज्यसभेवर उमेदवारी दिली होती.
Meeting Hon Home minister @AmitShah ji today. Very interesting exchange of ideas on several issues.@AmitShahOffice pic.twitter.com/vWXX2VBitH
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) July 7, 2022
शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. अश्यातच शिवसेनेचे खासदार भाजपच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी करत आहेत. तर आता दुसरीकडे भाजप माजी शिवसैनिकाला उपराष्ट्रपती पदाच तिकीट देऊन मोठा डाव खेळण्याची तयारीत आहे. त्यामुळे सुरेश प्रभू यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
