Share

IND vs ENG : विराट-राहुल नहीं तो क्या गम! भारतीय संघात युवा खेळाडूंचा जलवा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताने साउथॅम्प्टन टी-२० मध्ये इंग्लंडचा ५० धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १९८ धावा केल्या होत्या. दोन गडी गमावूनही, भारताने पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकात ६६ धावा केल्या होत्या. या सामन्यात विराट कोहली, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराहसारखे स्टार खेळाडू दुखापती आणि कसोटी खेळल्यामुळे संघाबाहेर होते. पण, भारताच्या युवा फलंदाजांनी या स्टार खेळाडूंची कमतरता भासू दिली नाही.

वरीष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताने गेल्या ८ महिन्यांत पाच टी-२० मालिका खेळल्या आहेत. भारत इंग्लंडविरुद्ध सहावी मालिका खेळत आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळली होती. यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्याविरुध्द टी-२० मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ ५ सामन्याची टी-२० मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. यानंतर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध २ टी-२० सामने खेळले आहेत.

विराट-रोहितच्या गैरहजेरीत संघ सामने जिंकला
या दरम्यानच्या काळात फक्त वेस्ट इंडीज मालिका अशी होती, ज्यामध्ये रोहित आणि विराट एकत्र खेळले होते. याशिवाय उर्वरित चार मालिकांमध्ये दोघेही एकत्र खेळलेले नाहीत. दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या खेळल्या गेलेल्या दोन मालिकांमध्ये हे दोन्ही फलंदाज संघात नव्हते. असे असूनही भारताने आयर्लंडचा क्लीन स्वीप केला आणि दक्षिण आफ्रिकेला बरोबरीत रोखण्यात यश मिळविले. या दोन्ही मालिकांमध्ये दीपक हुड्डासारख्या खेळाडूने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे.

हुडा-सूर्यकुमार जोडी बनवतेय १९० च्या स्ट्राइक रेटने धावा
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यावर नजर टाकली तर युवा फलंदाजांनी टी-२० क्रिकेटच्या गरजेनुसार फलंदाजी केली आहे. १३५-१४० ऐवजी १८० पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने धावा या खेळाडूंनी केल्या आहेत. दीपक हुडा, सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्या या तिघांनीही सारख्याच आक्रमकतेने फलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूपासूनच भारतीय फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!