Share

IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत अर्शदीप सिंग घालू शकतो धुमाकूळ; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये गेल्या दोन मोसमात थैमान घालणारा भारताचा २३ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या युवा वेगवान गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यातच किफायतशीर गोलंदाजी करताना दोन बळी घेत आपल्या टी-२० कारकिर्दीची शानदार सुरुवात केली आहे. त्याने आपल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण ३.३ षटके टाकली. या दरम्यान त्याने ५.१४ च्या इकॉनॉमीसह केवळ १८ धावा खर्च केल्या आहेत. पदार्पणाच्या सामन्यातच त्याच्या कौतुकास्पद कामगिरीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पदार्पणाच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करूनही अर्शदीप सिंग पुढील दोन सामन्यांमध्ये मैदानात दिसणार नाही. खरं तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात अर्शदीपचा समावेश करण्यात आलेला नाही. एजबॅस्टन कसोटीत भारतीय संघाची धुरा सांभाळणारा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत अर्शदीपला दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यांपासून संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

मात्र, तो पुन्हा एकदा एकदिवसीय मालिकेत मैदानात खेळताना दिसणार आहे. तसेच या मालिकेसाठी भारतीय संघातील वरीष्ठ खेळाडू पुनरागमन करत आहेत. त्यामुळे अर्शदीपला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामन्यांसाठी संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेतील सामने १२ जुलै ते १७ जुलै दरम्यान खेळवले जातील.

अर्शदीप सिंग डेथ ओव्हर्सचा स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही त्याने नवीन चेंडूने किफायतशीर गोलंदाजी केली. आयपीएल २०२२ मध्ये त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर अर्शदीपची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती. मात्र, त्या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आयर्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु येथेही त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नव्हती. आता त्याला इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!