मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच चर्चेत राहिले आहेत. एकनाथ शिंदे गटातील जवळपास सर्वच आमदारांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका टिपण्या केल्या आहेत. अनेक आमदारांनी तर या बंडाचे मुख्य कारण हे संजय राऊत यांनाच मानले आहे. बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांचाही जोरदार विरोध केला आहे. दरम्यान बंडखोर आमदारांच्या प्रतिक्रियांना उत्तर देताना संजय राऊत यांनी या शिंदे गटातील आमदारांसह भाजपवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्यासाठी भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव आहे. अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप सह बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.
सध्या संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच नगरसेवकांची बैठकही घेतली. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष मजबूत आहे. एक दोन लोक पळून गेले असतील, त्यांच्यासोबत शिवसेना गेलेली नाही. कृत्रिम पाऊस पाडतात तसं हे कृत्रिम वादळ आहे असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला. पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमाने, जिद्दीने कामाला लागली आहे, ती खूप पुढे गेलेली दिसेल असा इशाराही त्यांनी यावेळी शिंदे गटासह भाजपला दिला आहे.
भाजपला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे व पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायचा आहे. पण विंचवाचा डंख व विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर झुडुपातले राजकारण करणाऱ्यांना समजते. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने उघडेच असतात व बाहेर चपलांचे ढिगारे वाढतच आहेत. या वैभवाशी कसा सामना करणार? असा खोचक सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या :


