Share

Shambhuraje Desai : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर थेट शंभूराजे देसाईंनी केला पलटवार, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवसेंदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के देत आहेत. शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात समर्थन भेटत आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टार्गेट केलं आहे. माजी मंत्री शिंदे गटातील आमदार शंभूराजे देसाई यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय.

याआधी उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं की भाजप आणि शिंदे गटाला शिवसेना संपवायची आहे. यावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई म्हणाले,आम्हाला नाईलाजास्तव माविआमध्ये राहावं लागलं. गेल्या काही दिवसांपासून जे काही घडलं राजकारणात त्या नंतर तरी सामना मध्ये जे काय लिहीलं जातं ते थांबवलं जाईल असं वाटत होतं. अजूनही संजय राऊतांची तशीच भूमिका आहे. असं देसाई म्हणाले.

दरम्यान, काल ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनीही काल रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना समर्थन दिले. यामध्ये सुमारे ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!