मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. तो चाहत्यांसाठी सोशल मीडियावरून कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो हेअर स्टायलिस्टवर भडकलेला दिसत आहे.
रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. रितेशने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो मिरर समोर बसलेला आहे आणि त्याचा स्टायलिस्ट त्याची हेअर स्टाइल करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हेअरस्टायलिस्ट हेअर स्टाइल करण्याआधी त्याच्या केसांवर पाण्याचा स्प्रे मारताना दिसत आहे. पण तो बराच वेळ पाणी स्प्रे करत राहिल्यानं वैतागलेला रितेश त्याच्या हातातून ते पाण्याची स्प्रे बॉटल घेतो आणि बॉटलमधील सगळं पाणी स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतो.
https://www.instagram.com/p/Cfs-5-cj1hY/
व्हिडीओ शेअर करत रितेशनं कॅप्शनमध्ये लिहिलं कि, “मी शूटसाठी तयार होत आहे.” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते यावर वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


