नवी दिल्ली: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते खाली स्टेजवर कोसळले. जपान टाइम्सच्या एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्वीट करत हळहळ व्यक्त केली आहे.
“माझे प्रिय मित्र शिन्झो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे खूप दुःख झाले आहे. आमचे विचार आणि प्रार्थना त्यांच्या, त्यांचे कुटुंब आणि जपानच्या लोकांसोबत आहेत.”, असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Deeply distressed by the attack on my dear friend Abe Shinzo. Our thoughts and prayers are with him, his family, and the people of Japan.
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
दरम्यान अचानक झालेल्या या घटनेने काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेनंतरचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Nana Patole | काँग्रेस महाविकास आघाडी सोबतच राहिल – नाना पटोले
- Alia Bhatt : नीतू कपूरच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने शेअर केला खास फोटो; पाहा PHOTO
- Kalyan Dombivali : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला मोठा झटका; तब्बल ५५ नगरसेवकांच शिंदे गटाला समर्थन
- ENG vs IND : आर्रर्रर्र..! दीपक हुडाचा षटकार आणि थोडक्यात बचावले रवी शास्त्री; VIDEO होतोय व्हायरल!
- Sachin Sawant : “सरकारच्या स्थिरतेवर भाजपाच्या गोटात शंका…”, सचिन सावंत यांचा इशारा


