Share

Chandrakant Khaire : रामदास कदमांना मराठा नेत्यांवरून समाजात तेढ निर्माण करायचाय, चंद्रकांत खैरेंच वक्तव्य!

Published On: 

मुंबई : रामदास कदम यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे हे मराठा नेत्यांना मोठ होऊ देत नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रामदास कदम असे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आरोप करताना जे काही म्हटले आहे ते पूर्णपणे खोट आहे. अशा प्रकारच्या त्यांच्या वक्तव्यामुळे ते जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

“उद्धव ठाकरे दुजाभाव करतात. मराठा नेत्यांना ते मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना संपवायचं आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत. गळचेपी केली जातेय”, असे गंभीर आरोप रामदास कदम यांनी केले आहेत. “एवढे आमदार एकत्रितपणे पक्ष का सोडतात? एवढ्या खासदारांना आपण एकनाथ शिंदेंना पाठिंबा द्यावा, असा विचार का येतो? पक्ष फुटलाय. आतातरी उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करायला हवं, असं कदम म्हणाले आहेत. ता तुम्ही सगळ्यांना भेटताय. हे सगळं याआधी केलं असतं तर एवढी मोठी घटना घडली नसती”, असे रामदास कदम यांनी म्हटले होते.

रामदास कदम यांच्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, “रामदास कदमांचे आरोप साफ खोटे आहेत. अशी वक्तव्य करून त्यांना जातीपातीचं राजकारण करायचंय. समाजात तेढ निर्माण करायची आहे. आता ते असे आरोप करणारच, कारण १ तारखेला त्यांना घरी बसावं लागणार आहे, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील याचिकांवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. यावेळी सुप्रीम कोर्ट शिवसेनेकडूनच निर्णय देईल, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!