Ramdas Kadam। मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज शिवनेसेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.भाजपमधील नाराजीबद्दलही त्यांनी उघडपणे मत मांडले. या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात येत आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांनी टीका केली आहे.
रामदास कदम म्हणाले कि, तुमच्या आदित्य ठाकरेंचं शिवसेनेत योगदान काय? आदित्य ठाकरे हे तर आमदार आणि खासदारांनाही पाहत नाही. माझं खातं त्यांनी चालवलं. प्लास्टिक बंदी मी केली आणि हा माणूस म्हणतो प्लास्टिक बंदी मी केली. तेही सभागृहात सांगतो. किती खोटं बोलाल? दुसऱ्यांच्या कामाचं किती क्रेडिट घ्याल. हे हस्यास्पद आहे. असं चालत नाही, असं रामदास कदम म्हणाले.
तसेच पुढे आदित्य ठाकरेंना स्वत:चं खातं राहिलं बाजूला इतरांची खाती सांभाळायची आहेत. त्यांना आमदारांना भेटायचं नाही, खासदारांना भेटायचं नाही. आता तुमच्या जनसंवाद यात्रा सुरू आहेत. तुम्ही आता शिवसेना भवनाचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. सर्वांना भेटत आहात. हे जर तीन वर्ष केलं असतं तर शिवसेनेवर ही वेळ आली नसती, अशी टीकाही कदम यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ देत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप!
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडिवर बसून ते पक्ष चालवत आहेत – रामदास कदम
- Uddhav Thackeray : उद्या हे स्वतःला मोदी समजून पंतप्रधान पदावर दावा सांगतील; ठाकरेंचा शिंदेंना टोला
- Ramdas Kadam on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला – रामदास कदम
- मुरली विजयला मैदानात पाहून चाहते म्हणायला लागले डीके..डीके..डीके; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

