मुंबई : राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यांच्या या बंडामुळे शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले. पक्षातील आमदारांसह खासदारही शिंदे गटात सामील झाले. राज्यातील अनेक ठिकाणी आता या बंडामुळे शिवसेना कमजोर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पक्षाला पुन्हा बळ देण्यासाठी अक्षय प्रमुख उद्धव ठाकरेसह आदित्य ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. राज्यातील विविध ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांना एकजूट केले जात आहे.
या मोठ्या ऐतिहासिक बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुलाखतीला सामोरे गेले. सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांवर भाष्य केले आहे. यावर आता रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.
“उद्धव ठाकरे दुजाभाव करतात. मराठा नेत्यांना ते मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना संपवायचं आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत. गळचेपी केली जातेय”, असे गंभीर आरोप रामदास कदम यांनी केले आहेत. “एवढे आमदार एकत्रितपणे पक्ष का सोडतात? एवढ्या खासदारांना आपण एकनाथ शिंदेंना पाठिंबा द्यावा, असा विचार का येतो? पक्ष फुटलाय. आतातरी उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करायला हवं, असं कदम म्हणाले आहेत. ता तुम्ही सगळ्यांना भेटताय. हे सगळं याआधी केलं असतं तर एवढी मोठी घटना घडली नसती”, असंही ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्याने अनेक नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत. मात्र एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार तसेच नेते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख ऐवजी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मुरली विजयला मैदानात पाहून चाहते म्हणायला लागले डीके..डीके..डीके; पाहा VIDEO!
- Eknath Shinde meet Ratan Tata | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रतन टाटा यांची सदिच्छा भेट
- Sandeep Deshpande : “हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?”, मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
- Uddhav Thackeray : बाळासाहेबांना दिलेले वचन अजूनही अपूर्ण!, उद्धव ठाकरे मुलाखतीत असे का म्हणाले?
- महाराष्ट्र सुपर मॉडेलचा महाअंतिम सोहळा संपन्न


