🕒 1 min read
Shivsena। मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही गट मूळ शिवसेनेचेच असल्याचा दावा करत आहेत. तर शिवसैनिक आजही आपल्या पाठिशी आहेत, असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यातून द्यायचा आहे, मात्र त्याच्या परवानगीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावरून आता शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
रामदास कदम म्हणाले कि, बाळासाहेब संपूर्ण देशाला एक विचार देत होते. मात्र आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे विचार देतील ते काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधींचे विचार असतील. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार देशभरात पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला पाहिजे, असे रामदास कदम म्हणाले. दरम्यान, शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी पुरजोर प्रयत्न करायचे, पण पालिकेने वा न्यायालयाने परवानगी नाकारल्यास शिंदे गटाने दुसरा पर्याय तयार ठेवला आहे. बीकेसीतील मैदानाचा पर्याय शिंदे गटाने खुला ठेवला आहे.
दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाची बैठक
याआधी शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, हा दसरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. यामुळे शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिंदे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा झाली असून शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Bhaskar Jadhav । सापाला दूध पाजलं, तरी तो विषच ओकणार; भास्कर जाधवांची जहरी टीका
- Marathwada Mukti Sangram Day 2022 | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
- Narayan Rane |आदित्य बालिश आहेस, गप्प बस; नारायण राणेंचा इशारा
- Eknath Shinde | पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावावा – एकनाथ शिंदे
- Remedies For Dengue | डेंग्यूमध्ये शेळीचे दूध, नारळ पाणी आणि पपईच्या पानांच्या रसाचे आहे अनेक फायदे..जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
