Share

NCP on Shinde government | सत्तेसाठी लाचारी करणाऱ्यांना जनतेचे हाल दिसत नाहीत ; राष्ट्रवादीची शिंदे सरकारवर टीका

Published On: 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पुराने थैमान घातला आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुरातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबत फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट शिंदे सरकारवर टीका केली आहे. बंडखोरी करून सत्ता मिळवल्यानंतरही परिस्थिती बिकट आहे. राज्यात पूर परिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पूल नसल्याने पुराच्या पाण्यात मानवी साखळी बनवून विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पूरग्रस्त भागात पालकमंत्री नाहीत, महाराष्ट्रात फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे काम सुरू आहे. मंत्रिपदाचा गुंता सोडवण्यातच त्यांचा काळ जात आहे, असे चित्र सध्या राज्यात दिसत असून सत्तेसाठी लाचारी करणाऱ्यांना जनतेचे हाल मात्र दिसत नाही आहेत, अशी टीका राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संजय राठोड यांच्यावर देखील टीका केली आहे. “दारव्हा-दिग्रस मतदारसंघात चौथ्यांदा प्रतिनिधित्व करत असलेले शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघातील ही दयनीय अवस्था. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. निधी मिळत नाही, आमची कामं होत नाहीत, असा कांगावा करत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. मात्र २०१४ ते २०१९ आणि त्यानंतर मविआ सरकारच्या काळात मंत्रिपद आणि यवतमाळचे पालकमंत्रीपद असून देखील आदिवासी भागातील जनतेसाठी मूलभूत सोयी-सुविधा राठोड यांना पुरविता आल्या नाहीत,” असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!