Share

Uddhav Thackeray : उद्या हे स्वतःला मोदी समजून पंतप्रधान पदावर दावा सांगतील; ठाकरेंचा शिंदेंना टोला

Published On: 

 मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची सध्या चांगलीच चर्चा आहे. मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारित केला जात आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ‘प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान, उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा एक भाग काल प्रसिद्ध झाला होता. तर दुसरा भाग आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाला सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ठाकरे म्हणाले, प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वतःला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. भाजपावाल्यांनो सावधान रावे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!