Share

“शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं म्हणजे…”, यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्याला शिवसेनेचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याच्या महिला  व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी ‘शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते,’ असे मोठे वक्तव्य केले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gonhe) यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. “आज नामदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असे विधान केले आहे की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर वेगळं चित्र दिसलं असतं. शरद पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाहीये. पण मला तर वाटतं त्यांना युपीएचं अध्यक्ष करावं, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल. यशोमतीताई तुम्ही असा प्रस्ताव द्याल का?”, असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी विचारला आहे.

यशोमती ठाकूर नेमक्या काय म्हणाल्या?

‘शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं.’ तसेच चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. शरद पवार आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार. असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात भागीदार होऊ नका, अन्यथा राजभवनाची इभ्रत जाईल”; संजय राऊत

“आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर…”, यशोमती ठाकूर यांचे मोठे वक्तव्य

“…हीच परंपरागत शिवसेनेची जागा मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला दिली”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र

“भाजपचे लोक पिसाळलेला कुत्रा…”; संजय गायकवाड आक्रमक

“मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले तर…”, करणी सेनेचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!