Share

“भाजपचे लोक पिसाळलेला कुत्रा…”; संजय गायकवाड आक्रमक

Published On: 

बुलढाणा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर बुलढाण्यामधील शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी दिले आहे.

भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत आहेत, असे म्हणत अनिल बोंडे यांना संजय गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. यासह संजय गायकवाड म्हणाले की, शरद पवार साहेबांची उंची हे कधीच समजू शकत नाहीत शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना उभं करण्याचे काम केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची जोड दिली. केंद्रीय कृषीमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. हे धाडस फक्त शरद पवार करू शकतात.

तसेच शरद पवार अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, ते कधीही कोणाला वाईट बोलले नाहीत. त्यांनी कोणाला अपशब्द वापरला नाही. त्यांच्या घरावर अशाप्रकारे हल्ला होणे हे दुर्दैवी आहे. हे आंदोलन पूर्ण नियोजन पद्धतीने करण्यात आले. भाजप राज्यातील सरकार अस्थिर करून पाहत असल्याचा आरोपही संजय गायकवाड यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

JNU Violence : मांसाहार केल्यावरून ABVP आणि JNUSU आमने-सामने; वाचा सविस्तर
किरीट सोमय्या मुलासह फरार, लूकआऊट काढा ; संजय राऊत आक्रमक
“मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात कोण संपलंय…”, ‘मनसे’चे खुले आव्हान
अनिल परब यांच्या ‘त्या’ निर्णयावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “तुरुंगात असणारे नवाब मलिक…”
“गेली सांगून मवि आघाडी की जनते परीस कुत्रीमांजरी…” , भातखळकरांचा टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!