🕒 1 min read
अमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलता असतांना ‘शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते,’ असे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केले. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
यावेळी बोलत असतांना यशोमती ठाकूर म्हणाल्या की,‘शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं.’ तसेच चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘शरद पवार आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार’, असेही यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
- किरीट सोमय्या मुलासह फरार, लूकआऊट काढा ; संजय राऊत आक्रमक
- JNU Violence : मांसाहार केल्यावरून ABVP आणि JNUSU आमने-सामने; वाचा सविस्तर
- “मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले तर…”, करणी सेनेचा इशारा
- “भाजपचे लोक पिसाळलेला कुत्रा…”; संजय गायकवाड आक्रमक
- अनिल परब यांच्या ‘त्या’ निर्णयावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “तुरुंगात असणारे नवाब मलिक…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
