🕒 1 min read
मुंबई: कोल्हापूर उत्तर विभानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (१० एप्रिल) ऑनलाईन प्रचारसभा घेतली. यात त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये भाजप आणि काँग्रेसची छुपी युती झाली असल्याचा आरोप करत २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमधील आकडेवारी सांगितली आणि भाजपवर निशाणा साधला. यावरच आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत टीका प्रत्युत्तर दिले आहे.
“कोल्हापूर उत्तर ही विधानसभा गेल्या सात पैकी भाजपसोबत युतीत पाचवेळा शिवसेनेने जिंकली. फक्त दोन वेळा कॉंग्रेसला मिळाली. हिंदुत्वाला मानणारा हा मतदार आज हीच परंपरागत शिवसेनेची जागा मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला दिली. अशीच नांदेड दिली. हक्काच्या जागा कॉंग्रेसला दिल्या.”, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे नेमके काय म्हणाले?
२०१४ साली एकनाथ रावांचा फोन आला. आपलं जागा वाटपाचं काही जुळतं नाही, आपण स्वतंत्र लढूया. त्यावेळी शिवसेनेला ६९ हजार ७३६ मत मिळाली. तर भाजपला ४० हजार १०४ मत आणि काँग्रेसला मिळाली होती ४७ हजार ३१५ मत. मग २०१९ ला आपली युती झाली. तेव्हा आपल्याला भाजपच्या ४० हजार मतांपैकी किमान ३५ हजार, ३०, २५, २० हजार तरी मत मिळायला हवी होती. पण त्यावेळी आपल्याला ७५ हजार एकूण मत मिळाली. म्हणजे ५ ते ६ हजार मत वाढली. मग युती मधील ही भाजपची ४० हजार मत कुठे गेली? का पंचगंगेच्या दुषित पाण्यासारखी तुमच्या मतांमध्येही प्रदुषण झालं का? असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
“भाजपचे लोक पिसाळलेला कुत्रा…”; संजय गायकवाड आक्रमक
“मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले तर…”, करणी सेनेचा इशारा
JNU Violence : मांसाहार केल्यावरून ABVP आणि JNUSU आमने-सामने; वाचा सविस्तर
किरीट सोमय्या मुलासह फरार, लूकआऊट नोटीस काढा ; संजय राऊत आक्रमक
“मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात कोण संपलंय…”, ‘मनसे’चे खुले आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
