औरंगाबाद : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच या वादात आता करणी सेनेनी देखील उडी घेतली आहे.
या मुद्द्यावर औरंगाबाद येथे आयोजित करणी सेना महासंमेलनाच्या वेळी बोलत असतांना करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल सिंह अम्मू म्हणाले की,‘ मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले तर ते करणी सेनेच्या कार्यकत्यांनी काढावेत,’ असा इशारा सूरजपालसिंह अम्मू यांनी दिला. तसेच उच्च न्यायालयही संवैधानिक संस्था असून त्यांचा निर्णय सर्वासाठी बंधनकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देश चालतो, उच्च न्यायालयही त्याचाच एक भाग आहे, असेही अम्मू यावेळी म्हणाले.
दरम्यान,‘अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, पण तिथे भोंगे बसवल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगण्यात आले आहे.’ तसेच यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असे राज ठाकरे २ एप्रिल रोजी पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
- किरीट सोमय्या मुलासह फरार, लूकआऊट काढा ; संजय राऊत आक्रमक
- “जो धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये वाद निर्माण करतोय अशा…”, शरद पवारांचा इशारा
- “सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात भाजपचे मोठे योगदान”, राऊतांचा गंभीर आरोप
- “गेली सांगून मवि आघाडी की जनते परीस कुत्रीमांजरी…” , भातखळकरांचा टोला
- अनिल परब यांच्या ‘त्या’ निर्णयावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “तुरुंगात असणारे नवाब मलिक…”


