Share

Vinayak Raut : शिवसेना पक्ष आजही मजबुतीने उभा, निवडणुका झाल्या तर १०० आमदार निवडून येतील – विनायक राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. दररोज काहीतरी नवीन गोष्टी घडत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे गट व भाजपने सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. या दरम्यान आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि कोणत्या नेत्यांना कोणती पदे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील केलेल्या बंडावर बोलताना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे. शिवसेना आजही पूर्ण ताकदीने उभी आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

‘आजही मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे किमान १०० आमदार निवडून येतील. उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळे शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेनं त्यांना वाढवलेलं आहे.’ आशा शब्दांत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेत उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यावरही जोरदार टीका केली आहे, राऊत आज चिपळूणमध्ये बोलत होते.

‘ही शिवसेना उद्धव साहेबांचीच शिवसेना आहे बंडखोरांची नाही’, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी उदय सामंत आणि दीपक केसरकर यांचा समाचार घेतला. जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारात विकले गेलेले आहे त्यांची मुळीच चिंता नाही आहे. शिवसेना पक्ष आज ही मजबुतीने उभे आहे. दरम्यान शिवसेनेचा रत्नागिरीत १० तारखेला जो मेळावा होणार आहे, त्यामध्ये येण्याचा उदय सामंत यांना नैतिक अधिकार नाही. आणि त्यांनी येऊही नये, असंही राऊत यांनी आमदार सामंत यांना सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!