Share

Eknath Shinde : अजूनही ठाकरे कुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पाठीशी, घरातील भिंतीवरील फोटोंनी वेधलं लक्ष

Published On: 

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. या सत्तासंघर्षात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी स्वपक्षाविरोधातच बंड पुकारलं होत. यानंतर शिवसेनेला अजूनही धक्क्यांवर धक्के बसत आहेत. मात्र एवढं सगळं घडून आम्ही आजून शिवसेनेतच आहोत असं शिंदे वारंवार सांगत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून आषाढी एकादशीची शासकीय महापूजा कोण करणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. पण या चर्चांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या हस्ते पूजा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्ष आणि सदस्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना महापूजेसाठी आमंत्रित केले. यावेळी भिंतीवरील ठाकरे कुटुंबाचे फोटो लक्ष वेधून घेत होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या घरात आजही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहे तसेच आहेत.

दरम्यान, या फोटोत भिंतीवरील ठाकरे कुटुंबाचे फाटोनीं सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पूजेचं निमंत्रण दिलं आहे. १० जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!