🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सहकार्याने महाराष्ट्र विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. शिवसेनेसोबत दगा केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि भाजपला मध्यावधी निवडणुकीत उतरण्याचे आव्हान दिले आहे. भाजप व मित्रपक्ष सोडता सर्व विरोधी पक्ष शिंदे सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील यांनी देखील शिंदे सरकारवर टीका करत इशारा दिला आहे.
सचिन सावंत म्हणाले, ‘दुर्योधन’ म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन व ‘दु:शासन’ म्हणजेच मोदी सरकारच्या अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा.
'दुर्योधन' म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन व 'दु:शासन' म्हणजेच मोदी सरकारच्या अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 5, 2022
मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू-
महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले. मंगळवारी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी राज्याच्या विदर्भाच्या विकासाबाबत आश्वासन दिले. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूळ गावी नागपूर येथे पोहोचल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील होत्या.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
