Share

शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता! पत्नीकडून अकोल्यात पोलीस तक्रार दाखल

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर संपूर्ण महाविकास आघाडी सरकारमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकारचे तिन्ही पक्ष आता एकापाठोपाठ एक बैठक घेताना दिसत आहेत. तिन्ही पक्षांतर्गत नाराजीचे वृत्त सर्व बाजूंनी येत आहे. विधान परिषद आणि राज्यसभेतील क्रॉस व्होटिंगने तिन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे.

पण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे सर्वांना धक्का दिला. एकनाथ शिंदे १३ आमदारांसह गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत.  त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या पडझडीची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर देशमुख यांचा फोन बंद आहे. कोणताही संपर्क नाही, सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र नितीन देशमुख देखील सुरतमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता कार्यकर्ते आणि पदाधिकारीही नॉट रिचेबल आहेत. सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या शहर कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे हेही नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांच्यासह उपशहरप्रमुख गणेश अहिवळे हेही पोहोचलेले नाहीत. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच प्रमुख नेते आणि पदाधिकारीही फोन बंद करून संपर्कापासून दूर आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!