मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निकालानंतर एकीकडे काँग्रेसमधील (congress) आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील (shivsena) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच ३ मंत्री नॉट रिचेबल आणि १३ आमदार असल्याचीही माहिती समोर आली आहे. हे सर्व आमदार आणि मंत्री हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अशातच बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर (Sanjay Raymulkar) यांनी आपल्या व्हाट्सअप डीपी वर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावून एक प्रकारे आपला पाठिंबा एकनाथ शिंदे यांना जाहीर केलाय.
तसेच शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी आपल्या व्हाट्सअप डीपी वर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला त्यामुळे त्यांनी उघड उघड पाठिंबा जाहीर केलाय का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तर बुलडाणाचे दुसरे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे देखील सकाळपासून नॉट रीचेबल होते, मात्र काही वेळापूर्वी त्यांचा फोन लागला असून ते आमदार निवास मध्येच असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यकाने सांगितले आहे.
दरम्यान, भाजपाने एकनाथ शिंदेंना ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. जर असं असेल तर महाविकासाआघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीतच अजून किती आमदार एकनाथ शिंदे सोबत त्या ठिकाणी आहेत ? ते काही वेळात उघड होईलच. मात्र आमदार संजय रायमुलकर यांनी आपला पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

