🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये असल्याचे वृत्त समजते. मात्र आता एकनाथ शिंदे चर्चेसाठी तयार झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याला सूरतला बोलावलं असल्याची माहितीही समोर आली आहे. एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्यात आता शिवसेनेला यश येईल का? पुढे काय होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र शिवसेनेचा नेमका कोणता नेता एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी रवाना झाले याबाबद अजून कळू शकलेलं नाही. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातच्या सूरतमधील एका हॉटेलात असून त्यांच्यासोबत काही आमदार आहेत अशी माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण इतके वेगाने बदलले की महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे 13 हून अधिक आमदारांसह सुरतला पोहोचल्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तातडीची बैठक बोलावावी लागली. या गदारोळात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना हायकमांडने दिल्लीत बोलावले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
