मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला जोरदार उत आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी खोचक ट्वीट केले आहे.
“माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणनाऱ्यांनी भाजपची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क-वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपला झेपणार नाही,” असे दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/deepalisayed/status/1539101499971842049
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय संकटादरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव यांच्यासमोर अट ठेवू शकतात, अशी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे उद्धव यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसपासून वेगळे होण्यास सांगू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट होणार आहे. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीवर चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेचे काही आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी सध्या संपर्क होत नसल्याचा दावा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण महाराष्ट्र राजस्थान किंवा मध्य प्रदेशपेक्षा खूप वेगळा आहे हे भाजपला लक्षात ठेवावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

