🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारमध्ये गदारोळ सरु झाला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून तीन दिवसांत तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वक्तव्य केले आहे. “आज एक दिवस असा जात नाही जेव्हा युपीमध्ये भाजपमधील लोक पक्ष सोडून गेले नाहीत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे.”, असे शरद पवार म्हणाले. भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला पक्ष आहे. सामान्यांच्या हिताबाबत यत्किंचितही आस्था नसलेला हा पक्ष आहे. आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्रं गेलेली आहेत. पण राजकारणात चढउतार होत असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात. आज लोक हळूहळू या विचारावर यायला लागले आहेत.”
आज एक दिवस असा जात नाही जेव्हा युपीमध्ये भाजपमधील लोक पक्ष सोडून गेले नाहीत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विजयराव गव्हाणे यांनी आपला निर्णय जाहीर केला.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 13, 2022
दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. उपाध्ये म्हणाले, “मुळात राष्ट्रवादी काँग्रेस कोणी आहे का? एक तर आपण स्वता (शरद पवार) काँग्रेसमधून बाहेर पडलेले त्यात तुमच्या सोबत सगळे इतर पक्षातील नेते. इतर पक्षातील एवढे नेते राष्ट्रवादीत आणूनही ना लोकसभेला २ आकडी खासदार आले ना विधानसभेला ७० ओलांडले. त्यामुळे स्वताचे काही नाही त्यांनी आले गेल्याची चिंता कशाला?”
महत्वाच्या बातम्या :
-
योगींनी फोनवरून मन वळवण्याचा प्रयत्न केला तरी मंत्र्याचा राजीनामा; युपीत भाजपला आणखी एक झटका
-
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात धाव
-
“फडणवीस हे स्जेजवरचे नट तर राणे आणि विखे-पाटील…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
-
“दीदींच्या प्रकृतीत सुधारणा.. ; बहीण आशा भोसले यांनी दिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
