लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारमध्ये गदारोळ सरु झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंह सैनी यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. राजीनामा देणारे सैनी हे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी आणि दारा सिंह चौहान यांनी बुधवारी राजीनामा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी फोनवरून धरमसिंह सैनी यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरी देखील आज धरमसिंह सैनी यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली.
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून तीन दिवसांत तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तिन्ही मंत्री ओबीसी समाजातील आहेत. सैनी हे पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या नकुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मंत्र्यांशिवाय ५ आमदारांनीही भाजपपासून फारकत घेतली आहे.
‘सामाजिक न्याय’ के एक और योद्धा डॉ. धर्म सिंह सैनी जी के आने से, सबका मेल-मिलाप-मिलन करानेवाली हमारी ‘सकारात्मक और प्रगतिशील राजनीति’ को और भी उत्साह व बल मिला है। सपा में उनका ससम्मान हार्दिक स्वागत एवं अभिनंदन!
बाइस में समावेशी-सौहार्द की जीत निश्चित है! #मेला_होबे pic.twitter.com/2FDkLLNW93
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 13, 2022
सपा सुप्रीमो आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विटरवर धरम सिंह सैनी यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. मेला होबे हॅशटॅग वापरून आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “सामाजिक न्यायाचे आणखी एक योद्धा डॉ. धरमसिंह सैनी जी यांच्या आगमनाने, सर्वांना एकत्र आणू पाहणाऱ्या आमच्या ‘सकारात्मक आणि पुरोगामी राजकारणाला’ अधिक चालना मिळते. आणि बळ मिळाले. सपामध्ये त्यांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा.
महत्वाच्या बातम्या :
मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; दिवसेंदिवस वाढतेय रुग्ण संख्या!
“राकेश टिकैतांसोबत राजकीय भेट नाही तर गळ्यात भगवं वस्त्र का?”; संजय राऊत म्हणाले…
राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक निर्बंधांचा इशारा
‘पुष्पा’ सिनेमातील हटके लूकमध्ये रवींद्र जडेजाला पाहून,अल्लू अर्जुनने केली कमेंट


