Share

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात धाव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्या असा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. मनसेने देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र आता सरकारचा हा निर्णय वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण, अॅड. गुणरत्ने सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) हे मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाद मागणार आहेत.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून देखील या निर्णयावर आक्षेप व्यक्त केला आहे. दुकानांच्या पाट्यांवरील मराठी भाषेतील (Marathi Nameplate on Shops) अक्षरं ही इतर भाषांपेक्षा मोठी हवी, असं राज्य सरकारने म्हटलं ते भारतीय संविधानाच्या आर्टीकल १९ चा भंग आहे, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राज्य सरकारचा निर्णय हा बालहट्टासारखा आहे. त्याचे कारण म्हणजे मराठी लिपीतील दुकानावरील नामफलक असावा असे म्हटले आहे. सरकारने ट्रेडमार्क लोगोसारख्या बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय अमान्य करावा, अशी विनंती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारला केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!