Share

“दीदींच्या प्रकृतीत सुधारणा.. ; बहीण आशा भोसले यांनी दिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा संसर्ग देशात पुन्हा वाढत आहे. अनेक कलाकारांना संसर्ग झाला. आता भारतरत्न लता मंगेशकर (Famous singer Lata Mangeshkar) यांना कोरोना (covid-19) आणि न्यूमोनियाची लागण झाल्यानंतर मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात (Breach Candy Hospital in Mumbai) त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. अशातच लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले (sister Asha Bhosale) यांनी पहिल्यांदाच लतादीदींच्या प्रकृतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान गायिका आशा भोसले यांनी बहीण लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले म्हणाल्या, ‘रुग्णालयानं ठरवून दिलेल्या वेळाप्रत्रकाप्रमाणे लतादीदींना औषधं दिली जात आहेत. पण रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे दीदींना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मी त्यांना भेटण्यासाठी गेले होते पण त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली नाही. कोरोनाचं वाढतं संक्रमण पाहता रुग्णालयाकडून नियमांच काटेकोर पालन केलं जात आहे.’

https://www.instagram.com/p/B28n3x4iwrV/?utm_source=ig_web_copy_link

दीदींच्या प्रकृतीमध्येही सुधारणा होत आहे. आता अगोदरच्या तुलनेत त्यांची प्रकृती चांगली आहे. आमची बहीण उषा मंगेशकर सातत्यानं दीदी आणि माझ्या संपर्कात असून ती आम्हाला दीदींच्या प्रकृतीची माहिती देत असते.’ तसेच ‘त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे’ अशी माहिती दीदींवर उपचार करत असलेले डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना सध्यातरी कोणत्याही व्हेंटिलेटर सपोर्टची गरज नाही. लता दीदींच्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशाभरातून प्रार्थना केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!