Share

मराठी पाट्यांवरून शिवसेना ‘अॅक्शन’ मोडमध्ये

Published On: 

मुंबई: राज्यमंत्री मंडळाची बुधवारी बैठक पार पाडली. या दुकानांवर मराठी पाट्याच लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत झालेल्या या निर्णयानंतर शिवसेना (Shivsena) आता ‘अॅक्शन मोड’ मध्ये आली असल्याचे दिसत आहे. या निर्णयानंतर शिवसैनिकांनी आता मुंबईमध्ये (Mumbai) रस्त्यावर उतरुन दुकानदारांना यासंबंधी सूचना द्यायला सुरुवात केली आहे.

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात गुरुवारी शिवसैनिकांकडून दुकानदारांना स्मरणपत्रे वाटण्यात आली. या माध्यमातून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची आठवण व्यापाऱ्यांना करुन देण्यात आली. राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर ठळक अक्षरात मराठी पाटया लावण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये चढाओढ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले आहेच पण त्याच सोबत हे श्रेय महाराष्ट्र सैनिकांचेच आहे, ते लाटण्याचा आचरटपणा कोणीही करु नये, असेही ठणकावून सांगितले आहे. तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारवर टोला लगावत म्हणले की, निवडणुकीच्यानिमित्ताने शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे मराठी पाट्यांचा निर्णय घेतला, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!